वर्ल्ड कप जिंकण्यासाठी श्रीलंकेचा मास्टर प्लॅन तयार! दिग्गज वेगवान गोलंदाजाची टीममध्ये एन्ट्री!
आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (ICC T-20 World Cup 2026) श्रीलंकेने लसिथ मलिंगावर (Lasith malinga) मोठी जबाबदारी सोपवली आहे. मलिंगाची वेगवान गोलंदाजी सल्लागार (Fast Bowling Consultant) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मलिंगा 15 डिसेंबर ते 25 जानेवारी या काळात श्रीलंकेच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. संघाची ‘डेथ बॉलिंग’ (अंतिम षटकांतील गोलंदाजी) मजबूत करण्यासाठी मलिंगाच्या अनुभवाचा वापर केला जाणार आहे. मलिंगाच्याच नेतृत्वाखाली श्रीलंकेने 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामुळे त्याचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल.
यंदाचा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत होणार असल्याने श्रीलंका आपले सर्व साखळी सामने मायदेशातच खेळणार आहे. श्रीलंका 8 फेब्रुवारी रोजी विरुद्ध आयर्लंड विरुद्ध कोलंबो येथे सामना खेळून स्पर्धेला सुरुवात करेल. तर 12 फेब्रुवारी ओमान,16 फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया आणि 19 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका सामने खेळेल.
या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचे नेतृत्व दासुन शनाका (Dasun shanaka) करणार आहे. संघात वानिंदू हसरंगा, मथीशा पाथिराना, दुष्मंत चमीरा आणि महेश तीक्षणा यांसारखे स्टार खेळाडू असल्याने मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली हा संघ अधिक घातक ठरू शकतो.
Comments are closed.