टी 20 वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
येत्या फेब्रुवारी महिन्यात पुरूषांच्या टी 20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्याकडे स्पर्धेचे यजमानपद असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला नेदरलॅंड्स विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वाच्या नाकी नऊ आणणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघावर मात्र दुखापतीचे सावट पसरले आहे. कांगारूचा आणखी खेळाडू जखमी झाला असून तो टी 20 विश्वचषकात खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुकतेच ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस स्थानिक टी20 स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळताना जखमी झाला. स्टॉयनिस बीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळत असून संघाचे नेतृत्वही करत आहे. या लीगमध्ये त्याला ऍडलेड स्टायकर्स विरुद्ध फलंदाजी करताना दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला ज्यामुळे तो ड्रेसिंग रुममध्ये परतला.
सामना संपल्यावर स्टॉयनिसने त्याच्या दुखापतीवर विधानही केले आहे. त्याने म्हटले, ” तपासणीनंतर कळेल दुखापत किती गंभीर आहे ते. सध्यातरी मला ठीक वाटत आहे. जेव्हा मला चेंडू लागला तेव्हाच मी पुढे खेळण्याचे टाळले आणि जोखीम घेतली नाही. एक मात्र नक्की की मी बीबीएलचे अंतिम सामना आणि टी 20 विश्वचषक खेळणारच.”
स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाचा महत्वपूर्ण खेळाडू असून त्याला झालेली दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याने फलंदाजीबरोबर उत्तम गोलंदाजी करत राष्ट्रीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. अलिकडेच तो भन्नाट खेळीने संघातच्या अंतिम अकरामध्ये राहिला आहे. त्यातच ही दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. कारण आधीच ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, टिम डेविड आणि जोश हेजलवूड दुखापतीतून सावरत आहेत.
Comments are closed.