चेपॉकवर खेळ रंगणार, की पावसाचा ‘नो रिझल्ट’ टीम इंडियाचं टेन्शन वाढवणार?, जाणून घ्या चेन्नईचं हव
IND vs ZIM चेन्नई हवामान अपडेट बातम्या : 2026 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पुढील सुपर -8 सामन्यात झिम्बाब्वेशी सामना होईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. जर टीम इंडियाला या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत झिम्बाब्वेला हरवावे लागेल. पण या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की पाऊस सामन्यात व्यत्यय आणेल का? जर पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?…
गतविजेते भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात उपांत्य फेरीतील लढत कायम राहण्यासाठी चेन्नईत कारस्थान 🏏
कसे पहावे #T20WorldCup 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/FxTWYEFxTC
— ICC (@ICC) 26 फेब्रुवारी 2026
पावसामुळे सामना रद्द झाला तर? (IND vs ZIM चेन्नई हवामान अपडेट बातम्या)
भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला, किंवा पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत भारताचे गुण जास्तीत जास्त तीनपर्यंतच पोहोचू शकतात. त्यामुळे सेमीफायनलची दारे जवळपास बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, विजयाशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नाही. पण फॅन्ससाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या सामन्यादिवशी पावसाची शक्यता नसल्याचे अंदाज सांगतात.
चेन्नईतील हवामानाचा अंदाज कसा? (What Weather forecast in Chennai?)
हवामान अंदाजानुसार गुरुवारी चेन्नईत आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान सुमारे 31°C पर्यंत जाऊ शकते. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवेल. संध्याकाळी तापमान सुमारे 27°C पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचा कोणताही अंदाज नाही. काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास 25% पावसाची शक्यता दर्शवण्यात आली होती, मात्र ताज्या अंदाजानुसार ती शक्यता शून्यावर आली आहे.
दोन्ही संघ
टीम इंडिया – ईशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, संजू सॅमसन
झिम्बाब्वे – तदिवानाशे मारुमानी (यष्टिरक्षक), ब्रायन बेनेट, डियोन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रजा (कर्णधार), टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रीम क्रेमर, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, बेन करन, क्लाइव्ह मडांडे, टिनोटेंडा मापोसा, वेलिंग्टन मसाकाद्झा
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.