टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या देशांविरुद्ध खेळणार, जाणून घ्या सविस्तर
टी-20 वर्ल्ड कप 2026 (T-20 World Cup 2026) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार आहे, तर अंतिम सामना 8 मार्चला खेळला जाईल. टीम इंडियाला नेदरलँड्स, पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिका या संघांसोबत एका गटात ठेवण्यात आले आहे.
भारतीय संघ आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav under captaincy) नेतृत्वाखाली भारत आपला विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरेल. संपूर्ण स्पर्धा 8 ठिकाणी खेळली जाणार असून त्यातील 5 ठिकाणे भारतात आणि 3 ठिकाणे श्रीलंकेत असतील.
टी-20 वर्ल्ड कप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स असा होईल. भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध असेल. टीम इंडियाला ग्रुप-ए मध्ये पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्यासोबत ठेवले आहे.
यानंतर 12 फेब्रुवारीला भारताचा सामना नवी दिल्लीमध्ये नामिबियाशी होईल. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाचा गेल्या वर्षभरातील परफॉर्मन्स जबरदस्त राहिला आहे. घरच्या मैदानावर सूर्या आणि त्याची टीम विजेतेपद टिकवण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे.
भारत–पाकिस्तानचा ‘महासंग्राम’ 15 फेब्रुवारीला श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळला जाईल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकाच गटात ठेवण्यात आले आहे. पाकिस्ताननंतर भारत आपला शेवटचा गटसामना अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.
फायनल सामना 8 मार्चला होणार आहे. मात्र फायनलचा वेन्यू पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतो की नाही यावर ठरेल. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला, तर सामना कोलंबोमध्ये होईल, आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला नाही, तर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल.
Comments are closed.