भारतीय वंशाचा खेळाडू बनला कर्णधार! 'या' देशाने जाहीर केला टी-20 वर्ल्ड कपसाठी आपला संघ
2026 च्या टी-20 (ICC T20 international world cup 2026) विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यावेळच्या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. भारत आणि श्रीलंकेसह अनेक देशांनी आपले संघ जाहीर केले असून, 14 जानेवारीला कॅनडानेही आपल्या संघाची घोषणा केली आहे.
कॅनडाच्या संघात मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. 22 वर्षांच्या दिलप्रीत बाजवा या भारतीय वंशाच्या खेळाडूकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. संघात अजयवीर हुंदल, अंश पटेल, रविंदरपाल सिंह, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा आणि युवराज समरा यांसारख्या भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे.
कॅनडाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि यूएई (UAE) हे संघ आहेत. विश्वचषकाची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत असली तरी, कॅनडाचा पहिला सामना 9 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. पहिल्याच सामन्यात कॅनडाची मोठी परीक्षा असणार आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी कॅनडाचा पूर्ण संघ:
दिलप्रीत बाजवा (कर्नाधर), अजयवीर हुंदल, अंश पटेल, दिलन हेलाईगर, हर्ष ठाकर, जसकरणदीप बुट्टर, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, रविंदरपाल सिंग, साद बिन जफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव, युवराज मोवा.
Comments are closed.