टीम इंडियाच्या 2 माजी प्रशिक्षकांनी ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून केले बाहेर, सनथ जयसूर्याने सगळं

T20 विश्वचषक 2026 श्रीलंका: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2026) श्रीलंकने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. 2021 च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करून श्रीलंकेने सुपर 8 मध्ये आपले (Sri Lanka) स्थान निश्चित केले. श्रीलंकेचा हा केवळ एका सामन्यातील विजय नव्हता तर तो नियोजन, संयम आणि टीमवर्कचा विजय होता.

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. दोन माजी भारतीय प्रशिक्षकांनी श्रीलंका संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली, असं सनथ जयसूर्याने सांगितले. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर (R Sridhar) आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत ज्या पद्धतीने काम केले ते मैदानावर दिसून आले, असं सनथ जयसूर्या म्हणाला. सनथ जयसूर्या यांनी स्पष्ट केले की, सराव सत्रादरम्यान स्पष्टपणे नियोजननूसार योजना आखली जात होती. क्षेत्ररक्षणाला चांगले करण्यावर आणि फलंदाजांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. ते म्हणाले की कधीकधी फलंदाजांवर जास्त दबाव निर्माण होतो, परंतु प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास कायम ठेवला, ज्यामुळे या विजयाचा पाया रचला गेला.

विक्रम राठोड आणि आर.श्रीधर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक- (R Sridhar and Vikram Rathour)

विक्रम राठोड 2019 ते 2024 पर्यंत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. यावेळी विक्रम राठोड यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांसोबत काम केले. त्यांच्या अनुभवामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना दबावाखाली कशा पद्धतीने खेळता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तर आर श्रीधर हे 2014 ते 2021 पर्यंत भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.

ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर- (Australia T20 World Cup 2026)

ऑस्ट्रेलियानं टी 20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. तर, ऑस्ट्रेलियाला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा झिम्बॉब्वेनं पराभूत केलं. यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल मॅच पार पडली. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला 8 विकेटनं पराभूत केलं. यामुळं तीन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 2 गुण आहेत. तर, झिम्बॉब्वेकडे आता  5 गुण आहेत. ऑस्ट्रेलियानं अखेरच्या सामन्यात ओमानवर विजय मिळवला तरी त्यांच्याकडे 4 गुण होतील. ते झिम्बॉब्वेच्या पुढं जाऊ शकत नाहीत. यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

सुपर 8 मध्ये कोण कोण पोहोचलं? (T20 World Cup 2026 Super-8)

ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ विश्वचषकातून बाहे गेला आहे. यापूर्वी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत बाद झाला होता. आतापर्यंत 7 संघ टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत. यामध्ये ब गटातून श्रीलंका आणि झिम्बॉब्वे, क गटातून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड, ड गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. अ गटातून भारत सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. अ गटातून पाकिस्तान आणि अमेरिका  याच्यांतील एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल.

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026 : टी 20 विश्वचषकातून कांगारु आऊट, ऑस्ट्रेलिया 2009 नंतर साखळी फेरीत पहिल्यांदा बाद, झिम्बॉब्वेला डबल लॉटरी

आणखी वाचा

Comments are closed.