निवडकर्त्यांच्या 5 अनपेक्षित निर्णयामुळे टीम इंडियात मोठे बदल, हे दिग्गज खेळाडू दुर्लक्षित!
भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) यांच्या यजमानपदाखाली 2026 चा टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. 20 डिसेंबर रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघ निवडीत अनेक दिग्गज खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Cheif Selecter of team india Ajit Agarkar) यांनी घेतलेले 5 मोठे निर्णय सर्वांना चकित करणारे ठरले आहेत
टी-20 वर्ल्ड कपच्या शर्यतीत ईशान किशनचे (Ishan kishan) नाव कुठेच चर्चेत नव्हते. मात्र, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करून त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि थेट वर्ल्ड कप संघात स्थान मिळवले.
भारतीय संघाने आपला उपकर्णधार बदलला आहे. शुबमन गिलला (Shubman gill) संघातून बाहेर काढण्यात आले असून, त्याच्या जागी अक्षर पटेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऋषभ पंतला (Rishbh Pant) यावेळेस संघात स्थान मिळालेले नाही. हा चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा मुख्य गोलंदाज असलेल्या मोहम्मद सिराजचा (Mohmmed Siraj) पत्ता यावेळी कट झाला आहे. 2024 च्या वर्ल्ड कप संघात सिराजचा समावेश होता, मात्र यावेळी त्याला संधी मिळालेली नाही.
हर्षित राणाला (Harshit Rana) त्याच्या साधारण कामगिरीनंतरही संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत त्याने फक्त 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि एका सामन्यात तर त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तरीही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
Comments are closed.