टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' देशाचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची झाली एन्ट्री!

टी-20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत असून, अंतिम सामना (8 मार्च) रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. संघात नवीन कर्णधाराची एन्ट्री झाली असून, अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेने 2014 साली टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.

टी-20 विश्वचषक 2026 साठी चरित असलंका याच्या जागी दासुन शनाका याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फलंदाज म्हणून असलंकाची कामगिरी खालावल्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सातत्याने आपल्या फलंदाजीने निराशाजनक कामगिरी करत होता.

टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना (7 जानेवारी) रोजी, तर दुसरा सामना 9 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. याशिवाय, तिसरा टी-20 सामना 11 जानेवारी रोजी होईल. या मालिकेनंतर श्रीलंका संघ टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मैदानात उतरेल.

श्रीलंकेचा संभाव्य संघ:
दासुन शांका (कर्नाधर), पाथुम निस्का, कुसल मेशारा, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, जेन्नित लिआंगे, चरिथ असल्का, कामिंदू असल्का, कामिंदू असलडीस, पवन रथनायेके, सहान अरचिगे, विंदू मिल्लेनगे, विंदू मिल्लेन, नुकेथलगे, विंदु रथनागे तुषारा, इशान मलगा, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथीराना, दिलशान मदुशांका, महेश ठेक्शा ठेक्शा ठेक्शा, दुशान हेमंथा, विजयकांत व्यासकांत आणि ट्रुबीन मंथू.

Comments are closed.