T20 World Cup 2026 – फलंदाजांची तोडफोड फटकेबाजी, वाचा कोणते आहेत सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 खेळाडू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने नेत्रदिपक कामगिरी करत विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेत संजू सॅमसनने सर्वांनाच थक्क करत टीम इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्याने मिळालेल्या संधीच सोनं करत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत सर्व कसर भरून काढली. त्याने 5 सामने खेळले आणि 321 धावा चोपून काढल्या. त्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक 24 षटकार मारत षटकारांचा बादशहा हा किताब आपल्या नावावर केला.

मी ठरवलं अन् करून दाखवलं…, विश्वविजयानंतर हार्दिक पंड्या भावूक; 2017 पासूनच्या संघर्षावर सोडले मौन

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये संजू सॅमसन पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फिन एलन आहे. एलनने 8 सामन्यांमध्ये 20 षटकार खेचले असून 298 धावा केल्या. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली आणि न्यूझीलंडने विजय संपादित केला. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा शेमरन हेटमायर, त्याने 7 सामन्यांमध्ये 19 षटकारांच्या जोरावर 248 धावा केल्या आहेत. पाकिस्तानाचा फरहान (18 षटकार) आणि टीम इंडियाचा इशान किशन (18) संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे.

Comments are closed.