IND vs ZIM: भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेचा ‘इतक्या’ धावांनी पराभव करणं अनिवार्य! अन्यथा नेट रन रेटमुळे स्वप्न भंगणार

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील काल म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 धावांनी हरवले.(West Indies vs zimbabwe) या विजयामुळे वेस्ट इंडिजचा रन रेट खूपच वाढला आहे. याचा फटका भारताला बसला असून, आता भारताला केवळ सामने जिंकून चालणार नाही, तर ते खूप मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
सुपर- 8 भारताचा पहिला सामना आफ्रिकेशी झाला होता, मात्र तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे भारत अजून एकही सामना जिंकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांनी हरवल्यामुळे भारताचा रन रेट -3.800 (निगेटिव्ह) आहे. त्यामुळे भारत जर उरलेले दोन्ही सामने जिंकला, तरी सेमीफायनलमध्ये जाईलच याची गॅरंटी नाही, कारण इतर संघांचा रन रेट भारतापेक्षा खूप चांगला आहे.
गुरुवारी होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) टीम इंडियासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. जर भारताने आधी फलंदाजी केली, तर झिम्बाब्वेला किमान 77 धावांनी हरवावे लागेल. तरच भारताचा रन रेट निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह (+) होईल. त्याचबरोबर जर भारताने नंतर फलंदाजी केली (धावांचा पाठलाग केला), तर रन रेट सुधारणे अधिक कठीण होईल.
म्हणजेच भारताला सेमीफायनल गाठायची असेल, तर झिम्बाब्वेला नुसते हरवून चालणार नाही, तर त्यांचा जोरदार पराभव करावा लागेल. रन रेट सुधारल्याशिवाय भारताचा रस्ता सोपा नसणार आहे.
Comments are closed.