टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? जाणून घ्या मोठी अपडेट समोर

2026 च्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) यांच्याकडे संयुक्तपणे आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून, मागील विश्वचषकाप्रमाणेच याही वेळी एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने मागील जेतेपद पटकावले होते, तर यावेळी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 20 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका सुरू असून, त्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. विश्वचषकाची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी होणार असून अंतिम सामना 8 मार्च 2026 होणार आहे.

विश्वचषकाचे गट (Groups):
अ गट: भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड.
ग्रुप बी: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
ग्रुप सी: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इटली, नेपाळ.
ग्रुप डी: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई.

टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ (Probable Squad):
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा.

Comments are closed.