T20 World Cup: स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक, कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके; जाणून घ्या

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये न्यूझीलंडने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) कॅनडाचा ८ विकेट्सने पराभव केला आणि सुपर-८मध्ये दाखल झाले. हा सामना चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भलेही न्यूझीलंडने मोठा विजय मिळवला, मात्र १९ वर्षापासून चालत आलेल्या त्याच्या एका कामगिरीत खंड पडला आहे.
टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध कधीही शतक झाले नव्हते. यंदा मात्र कॅनडाच्या १९ वर्षीय सलामीवीराने न्यूझीलंडचा हा विक्रम मोडला आहे. युवराज समराने ६५ चेंडूत ११० धावांची ऐतिहासिक खेळी केली. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. यामुळे कॅनडाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या. तरीही त्यांना हा सामना गमवावा लागला.
टी२० विश्वचषकात कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झाली हे माहित करून घेऊ.
२००७मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत १३ शतके झाली आहेत. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्ध केली गेली. बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंडचा माजी विकेटकीपर ब्रेंडन मॅक्युलमने २०१२मध्ये, पाकिस्तानचा अहमद शहजादने २०१४मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसोने २०२२मध्ये शतकी खेळी केल्या आहेत. तसेच श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने २०१४मध्ये आणि जोस बटलरने २०२२मध्ये शतके केली होती. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने २०२२ च्या टी२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध शतक केले होते.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतकी खेळी करण्याच्या विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत शतक पूर्ण केले होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात गेल ४८ चेंडूत १०० धावांवर नाबाद राहिला. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ११ षटकार मारले.
टी२० विश्वचषकातील सर्वात जलद शतके
क्रिस गेल – ४७ चेंडू विरुद्ध इंग्लंड (२०१६, मुंबई)
क्रिस गेल – ५० चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००७, जोहान्सबर्ग)
ब्रेंडन मॅक्युलम – ५१ चेंडू विरुद्ध बांगलादेश (२०१२, पल्लेकेले)
पथुम निस्सांका – ५२ चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२६, पल्लेकेले)
अहमद शहजाद – ५८ चेंडू विरुद्ध बांगलादेश (२०१४, मिरपूर)
रायली रुसो – ५२ चेंडू विरुद्ध बांगलादेश (२०२२, सिडनी)
सुरेश रैना – ५९ चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०१०, ग्रोस आयलेट)
टी२० विश्वचषकातील शतके-
२०२६ – युवराज सिंग समरा (११० विरुद्ध न्यूझीलंड)
2026 – पथुम निसांका (100* वि ऑस्ट्रेलिया)
2022 – ग्लेन फिलिप्स (104 वि श्रीलंका)
२०२२ – रायली रुसो (१०९ वि बांगलादेश)
२०२१ – जोस बटलर (१०१* विरुद्ध श्रीलंका)
२०१६ – क्रिस गेल (१००* विरुद्ध इंग्लंड)
2016 – तमीम इक्बाल (103 वि ओमान)
2014 – अहमद शेहजाद (111 वि. बांगलादेश)
२०१४ – ऍलक्स हेल्स (११६* विरुद्ध श्रीलंका)
2012 – ब्रेंडन मॅक्क्युलम (123 वि. बांगलादेश)
२०१० – महेला जयवर्धने (१०० विरुद्ध झिम्बाब्वे)
२०१० – सुरेश रैना (१०१ विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
२००७ – क्रिस गेल (११७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
Comments are closed.