T20 World Cup – सुपर 8 चा दंगा अन् पावसाचा पंगा! वरुणराजा गणित बिघडवणार? काय आहे ICC चा नियम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी20 वर्ल्ड कपचा थरार आता सुपर 8 च्या लढतीमुळे अधिक रोमांचकारी आणि रंगतदार होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनीही आपापल्या संघांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतू त्यांच्या या तयारीवर पाऊस पाणी फेरू शकतो. साखळी फेरीतील लढतींमध्ये पावसाने कोणताही व्यत्यय आणला नाही. मात्र, सुपर 8 मध्ये पावसाने राडा केला तर काय होणार? अशा परिस्थितीसाठी ICC ने यापूर्वीच आपली नियमावली जाहीर केली आहे.

हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आजपासून (21 फेब्रुवारी 2026) न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान लढतीपासून सुपर 8 च्या लढती सुरू होणार आहेत. हिंदुस्थानात खेळल्या जाणारे पावसामुळे रद्द होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतू श्रीलंकेत पावसामुळे साखळी फेरीतील सामना रद्द करावा लागला होता. सुपर 8 मध्येही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सामना रद्द होऊ शकतो. यासाठी ICC ने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.

ICC च्या नियमांनुसार पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास कमीत कमी 5-5 षटकांचा सामना खेळणं अनिवार्य आहे. जर 5-5 षटकांचाही सामना खेळला गेला नाही, तर अशा परिस्थितीत दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील. पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

Comments are closed.