IND vs PAK: कोलंबोची खेळपट्टी फलंदाज की गोलंदाज कुणाच्या बाजूने? पाहा खेळपट्टीचा संपूर्ण अंदाज

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारी, रविवारी भारत आणि पाकिस्तान (ICC T20 international world cup 2026) यांच्यातील महामुकाबला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. हा सामना नेमका कसा असेल आणि खेळपट्टी (Pitch) कोणाला साथ देईल?
या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत या मैदानावर तीन सामने (श्रीलंका वि. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड आणि झिम्बाब्वे वि. ऑस्ट्रेलिया) झाले आहेत. या तिन्ही सामन्यांत कोणत्याही संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध केलेला 182/6 असा आहे.
आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फिरकीपटूंना (Spinners) मदत करणारी ठरली आहे. या खेळपट्टीवर चेंडू कधी कमी तर कधी जास्त वेगाने येतो (Double Pace), ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण जाते. भारत-पाक सामन्यातही फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा या मैदानावरील चौथा सामना असेल.
सामन्याचा दबाव पाहता 200 धावा होणे कठीण वाटते, पण जर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली, तर हा आकडा गाठला जाऊ शकतो.
भारतीय संघाचा आर प्रेमदासा मैदानावरचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड
एकूण सामने: 15
विजय: 11
पराभव: 4
Comments are closed.