आशिया कप सुरु होत असतानाच टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा समोर, फायनलसाठी दोन ठिकाणं चर्चेत

नवी दिल्ली : आशिया कप 2025 आजपासून सुरु होत आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये तीन वेळा आमने सामने येऊ शकतात. क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरु शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 14 सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप सुरु होत असतानाच क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान केलं जाऊ शकतं. भारत आणि श्रीलंका 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचे संयुक्त आयोजक आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोनं एका रिपोर्टमध्ये तारखांसह फायनलच्या ठिकाणाबाबत देखील खुलासा केला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार  2026 च्या टी 20 वर्ल्ड कपची पहिली मॅच 7 फेब्रुवारीला होऊ शकते तर फायनल मॅच 8 मार्चला असेल. वर्ल्ड कपची फायनल अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळवली जाईल. फायनलचं ठिकाण भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचण्यावर ठरेल. जर पाकिस्तान अंतिम फेरित पोहोचला तर अंतिम सामना कोलंबोमध्ये होऊ शकतो.

2024 च्या टी 20 वर्ल्ड कप प्रमाणं पुढील वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होतील. एका गटात 5 संघ याप्रमाणं  4 गटात विभागणी केली जाईल. रिपोर्टनुसार अजून वेळापत्रक तयार करण्यात आलेलं नाही. मात्र, स्पर्धा सुरु होण्यासंदर्भात आणि फायनलच्या लढती संदर्भातील तारखा सहभागी देशांना कळवण्यात आल्या आहेत.

भारत 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. भारतानं दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये 7 धावांनी पराभूत करत विजय मिळवला होता. ग्रुप स्टेजनंतर चार गटातील प्रत्येकी दोन टीम सुपर8 मध्ये दाखल होतील. त्यानंतर सेमी फायनल आणि  फायनल अशा लढती होतील.

15 संघ स्पर्धेसाठी पात्र

2026 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 संघ पात्र ठरले आहेत. भारत पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अमेरिका, वेस्ट इंडीज, आयरलँड, कॅनडा, नेदरलँडस आणि इटली हे संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.