तापसी पन्नूने खरेदी केला मुंबईत चार कोटींचा फ्लॅट

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने मुंबईत नवीन प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 1390 फुटांचा असून बिल्ट अप एरिया 1669 चौरस फुटांचा आहे. या फ्लॅटची किंमत 4.33 कोटी रुपये आहे. पन्नू आणि तिची बहीण शगुन पन्नू यांनी फ्लॅटसाठी 21.65 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून मोजले आहेत, तर 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहेत. हा फ्लॅट गोरेगाव येथे आहे. तापसीने ‘थप्पड’, ‘पिंक’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे कौतुकही झाले आहे. ती ‘खेल खेल में’मध्ये दिसली होती, तर आगामी ‘वो लडकी है कहाँ’ आणि ‘गांधारी’ या चित्रपटात दिसणार आहे.
Comments are closed.