…पण कोणीही दहशतवाद पोसू नये, ‘तारक मेहता…’ फेम बबिताजींनी पाकला सुनावलं; हिंदुस्थानच्या जवानांना केला सॅल्यूट

जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये सैन्य कारवाई सुरू केली आहे. ऑपरेशन सिंदूर राबवत एकामागोमाग एक कठोर निर्णय घेऊन हिंदुस्थानने पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरमुळे खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या मायभगिनींच्या सौभाग्याला न्याय मिळला. हिंदुस्थानी सैन्याच्या या घवघवीत यशाला संपूर्ण देशाने सलाम केलाय. तर अनेकांनी पाकड्यांची अक्षरश: लाज काढली. अशात टीव्ही सिरीयल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानेही हिंदुस्थानी सैन्याचं कौतुक केलं. आणि पाकिस्तानवर तीव्र संताप व्यक्त केला.

पाकिस्तानवर कोणालाही दहशतवादाच्या सावलीत राहायचे नाही, 'तारक मेहता ..' च्या 'बबिता जी'

अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये ती म्हणाली की, कोणालाही युद्ध नको आहे. हे खरं आहे. पण कोणीही वर्षानुवर्षे दहशतवाद पोसू नये हेही तितकचं खरं आहे. मी हिंदुस्थानी सैन्यातील प्रत्येक शूर सैनिकासाठी प्रार्थना करेन, प्रत्येक सैनिकाने सुरक्षित रहावं आणि सुखरूप घरी परतावं. जय हिंद! असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच सध्याचे ट्रेंडिंग हॅशटॅग #Operationsindoor याचा देखील वापर मुनमुनने पोस्टमध्ये केला आहे.

हिंदुस्थानी सैन्याच्या कामगिरीला संपूर्ण हिंदुस्थानातून रोज पाठिंबा मिळतोय. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून प्रत्येक जण आपापल्या परीने सैन्याला प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे सैन्याचेही मनोबल वाढण्यात मदत होत आहे.

Operation Sindoor चं यश; जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या दोन मेहुण्यांसह टॉप-5 दहशतवाद्यांचा खात्मा, नावं आली समोर

Comments are closed.