ताडोबामध्ये बछडय़ाच्या जबडय़ात रुमाल; कचरा आणि मानवी हस्तक्षेपाचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या अधिवासात मानवी वापराच्या वस्तू वाढल्या आहेत. ‘के मार्क’ या वाघिणीचा बछडा तोंडात रुमाल पकडून फिरताना दिसल्याने व्याघ्रप्रकल्पातील कचरा व्यवस्थापन आणि मानवी हस्तक्षेपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ वाघिणीचे बछडे नैसर्गिक पाणवठय़ांमध्ये खेळताना, पोहताना यापूर्वीही दिसले आहेत. मात्र आता याच बछडय़ांपैकी एकाच्या तोंडात रुमाल दिसल्याने या परिसरात मानवी वापराच्या वस्तू पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सचिन तेंडुलकरनेही घेतली होती दखल

ताडोबातील ‘नयनतारा’ वाघिणीने पाणवठय़ातील प्लॅस्टिकची बाटली तोंडाने बाहेर काढल्याची घटना तर देशभर चर्चेत आली होती. या घटनेची दखल सचिन तेंडुलकर यांनीही घेतली होती.

Comments are closed.