‘हिंदुस्थानात माझा छळ करतील’, प्रत्यार्पणाविरोधात तहव्वूर राणाची अमेरिकेच्या न्यायालयात धाव

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात हिंदुस्थानात प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने हिंदुस्थानात पाठवल्यास माझा छळ केला जाईल, असं त्याने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. अद्याप त्याच्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही निर्णय सुनावलेला नाही. जर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली तर त्याला हिंदुथानात पाठवले जाईल.

काय आहेत राणावर आरोप?

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाने हल्ल्यातील आणखी एक मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला मदत केली होती. या हल्ल्यासाठी राणाने मुंबईतील ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.

Comments are closed.