दिल्ली दंगल दिल्ली दंगल प्रकरणात ताहिर हुसेन दोषी ठरला आहे
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने आता या संवेदनशील प्रकरणात आपला निकाल दिला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना दोषी जाहीर केले.
दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यासह पाच आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने अद्याप शिक्षेच्या युक्तिवादाची तारीख जाहीर केलेली नाही. मंगळवारी लेखी आदेश जारी झाल्यानंतर न्यायालय शिक्षेच्या युक्तिवादाची तारीख निश्चित होऊ शकते.
Ram Mandir Donation Scam अयोध्या देणगी अपहार प्रकरण…‘सर्वोच्च’ने मागवला एसआयटीचा अहवाल
अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणात एकूण 11 आरोपींवर खटला सुरू होता. त्यापैकी न्यायालयाने सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. ताहिर हुसेन यांच्यासोबत नाझिम, जावेद, कासिम आणि अनस यांनाही दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 365, 188, 153अ, 147, 148 आणि 149 अंतर्गत दोषी ठरवले, परंतु गुन्हेगारी कटाच्या (कलम 120ब) आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आपला निर्णय दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर ताहिर हुसेन यांना न्यायालयाच्या आवारात अश्रू अनावर झाले.
Comments are closed.