तैवानच्या रस्त्यांवर लागली हिंदुस्थानविरोधी पोस्टर्स; मजुरांना हाकलून द्या, ते गुन्हेगार असतात
तैवानमध्ये सध्या स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार करताना एका अपक्ष उमेदवाराने हिंदुस्थानविरोधी पोस्टर्स लावले आहे. या पोस्टरमध्ये पगडी घातलेल्या एका शीख व्यक्तीच्या चित्रावर ‘नो’ म्हणजे बंदीचे चित्र छापले आहे. हिंदुस्थानातून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांना विरोध करावा आणि त्यांना देशाबाहेर हाकलून दिले जावे, असा स्पष्ट संदेश यातून दिला आहे. तसेच तैवानमधील विरोधी पक्ष पुओमिनतांगसुद्धा हिंदुस्थानी मजुरांना देशात येण्यास विरोध करत आहे.
खासदार हुआंग चिएन-पिन यांनी हिंदुस्थानच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, हिंदुस्थानी मजुरांबाबत अधिक कठोर तपास आणि पाळत ठेवायला हवी. ते तैवानमध्ये महिलांवर बलात्कार करू शकतात. तैवानमधील एका हिंदुस्थान नागरिकाने सोशल मीडियावर याला वर्णद्वेषी भेदभाव म्हटले आहे. एखाद्या धोरणाला विरोध करणे वेगळी गोष्ट आहे, परंतु एखाद्या समुदायाच्या ओळखीला आणि सांस्पृतिक प्रतीकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.
Comments are closed.