कलंकित मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या; शिवसेनेचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

भ्रष्टाचार, हाणामारी, अनैतिक कृत्ये, असंसदीय भाषा, वादग्रस्त विधाने असे अनेक प्रकारचे आरोप महायुतीमधील विविध मंत्र्यांवर होत आहेत. पुराव्यादाखल व्हिडियो व्हायरल होत आहेत. तरीसुद्धा महायुती सरकार त्या मंत्र्यांवर कारवाई करत नाही. त्यामुळे शिवसेनेचे नेते उद्या थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या सकाळी साडेअकरा वाजता राजभवन येथे जाऊन राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती यावेळी राज्यपालांना केली जाणार आहे. त्यासंदर्भातील निवेदनही देण्यात येणार आहे.
Comments are closed.