पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर पखतूनख्वा प्रांतात तालिबानने पाकिस्तानला घेरले आहे. अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर गुरुवारी रॉकेट आणि मॉर्टरने हल्ला केला. मकीन आणि मालीखेलमधील सैन्य चौक्यांवर हल्ला केल्यानंतर तालिबानच्या हल्लेखोरांनी खैबरमधील लक्की मारवतच्या अणु प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण केले होते. पाकिस्तानी सैन्याने कारवाई करत या पैकी 8 कामगारांची मुक्तता केली. अपहरण केलेले कर्मचारी कंत्राटी होते, असे पाकच्या अणु आयोगाने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या हवाई दलाने 24 डिसेंबरला अफगाणिस्तानच्या पकतिका आणि खोस्त भागात एअर स्ट्राईक केला होता. यात 46 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून अफगाण तालिबानने टीटीपीसह आपले जवळपास 15 हजार तालिबानी खैबर पखतूनख्वा सीमेवर रवाना केले आहेत.
तालिबानने अपहरण केलेल्या कामगारांना वाहतून गाडीतून उतरवून ती पेटवून दिली. तालिबानने यानंतर एक व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये अपहरण करण्यात आलेले कामगार पाकिस्तान सरकारकडे मदत मागताना दिसत आहेत. टीटीपीच्या मागण्या पूर्ण करा आणि आमची मुक्तता करा, असे कामगार सांगत आहेत. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये बऱ्याच कालावधीपासून टीटीपीचे 10 प्रमुख कमांडकर कैद आहेत. त्यांना सोडण्याची मागणी टीटीपीने करत आहे.
टीटीपीचा हा चौथा हल्ला आहे. 2024 मध्ये टीटीपीने 265 हल्ले केले होते. यात पाकिस्तानचे 67 जवान मारले गेले. ऑगस्ट 2024 मध्ये टीटीपीने बाका खेलमध्ये गॅस पाइप लाइनच्या 3 कर्मचाऱ्यांना आणि नोव्हेंबरमध्ये 7 पोलिसांचे अपहरण केले होते. पाकिस्तानने टीटीपीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तर पाकिस्तान सरकारच्या अत्याचारांविरोधात आपली संघटना काम करते, असे टीटीपीचे म्हणणे आहे.
Comments are closed.