Skincare Tips: सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला स्वतःचीच लाळ लावते तमन्ना भाटिया; त्वचेला खरंच त्याचा फायदा होतो का?

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक जण घायाळ आहेत. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या सौंदर्याच्या रहस्याचा खुलासा केला आहे. सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला स्वतःचीच लाळ लावत असल्याचे तिने म्हंटले आहे. तिच्या या खुलाशानंतर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी लाळ ही चेहऱ्यासाठी फायदेशीर असते.

तमना काय म्हणते?

अलिकडेच एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या ब्युटी हॅकबद्दल सांगितले. चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरमे टाळण्यासाठी ती लाळ लावते. हा उपाय तिच्यासाठी खूप प्रभावी ठरल्याचे तिने सांगितले. तिने हे सांगितल्यानंतर तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

आयुर्वेदिक महत्त्व

आयुर्वेदानुसार, सकाळी तोंडात तयार होणारी लाळ ही अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असते. कारण जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा लाळेमध्ये असे काही एंजाइम तयार होतात, ज्यामध्ये मुरुम मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असते.

असेही दुष्परिणाम

लाळ ही त्वचेसाठी फायदेशीर असली तरी ते प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईल असे नाही. कधी कधी त्यामुळे समस्या आणखीनच वाढू शकतात. म्हणजेच याची रिऍक्शन होऊ शकते.

पॅच टेस्ट करा

जर तुम्हाला तमन्नाने सांगितलेला उपाय ट्राय करायचाच असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा. म्हणजेच चेहऱ्याच्या एखाद्या छोट्या भागावर हा उपाय करून पाहा. जर जळजळ, खाज सुटणे किंवा लालसरपणा जाणवत असेल तर चेहरा लगेच स्वच्छ पाण्याने धुवा.

Comments are closed.