विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती तमन्ना, प्रेमात आकंठ बुडालेले दोघेही? एका फोटोनं माजलेली खळबळ

डेटिंग डेटिंग डेटिंग डेटिंग एडी व्हिज लेटर्सचा अँथ: ‘बाहुबली’ सिनेमातून (Bahubali Movie) चर्चेत आलेली तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia) आजही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. बॉलिवूडची मिल्की ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमन्नानं आजवर साऊथपासून अगदी बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ओटीटी असो किंवा सिल्वर स्क्रिन, तमन्नानं सगळीकडे आपली छाप सोडलीय. अलिकडेच तमन्ना विजय वर्मासोबतच्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत होती. दोघांच्या चर्चा खूपच रंगलेल्या. अनेक इव्हेंट्समध्येही दोघे एकत्र दिसून यायचे. पण, त्यानंतर अगदी काही महिन्यांतच दोघेही वेगळे झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांमध्ये नेमकं काय झालं? खरंच ब्रेकअप झालं का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण, उत्तर काही मिळालं नाही. आज विजय वर्मासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असणाऱ्या तमन्ना भाटीयाचं नाव कधीकाळी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ‘रन मशीन’ विराट कोहली (Virat Kohli) आणि अब्दुल रझाक (Abdul Razzaq) यांच्यासोबतच्या नात्यातील अफवांमुळे चर्चेत होती. ‘द ललंटॉप’ला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत बोलताना तमन्नानं तिच्या डेटिंग आणि लग्नाच्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे.

आपण सुरुवातीला विराथ केले? (डीड तमान भटिया कधी विराट कोहिची तारीख आहे?

बॉलिवूड जगतात अशा चर्चा रंगल्यात की, कधीकाळी तमन्ना भाटीयानं विराट कोहलीला डेट केलेलं. पण, यामध्ये किती तथ्य आहे? यावर बोलताना तमन्नानं सांगितलं की, “मला या अफवांबाबत खरंच खूप वाईट वाटतंय, कारण मी त्याला फक्त एका दिवसासाठी भेटेले होते. शुटिंगनंतर मी कधीही विराटला भेटले नाही… मी त्याच्याशी कधीच बोलले नाही आणि त्याला भेटलेही नाही…”


विराट आणि तमन्नाच्या अफेअरच्या चर्चा रंगण्याचं कारण काय?

2010 च्या दशकात तमन्ना आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झालेला. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर लोकांनी दावा केला की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. पण काही काळानंतर त्यांची जाहीरात समोर आली. त्यावेळी दोघांची भेटही जाहीरातीच्या शुटिंगसाठीच झाली होती.

कधीकाळी रंगलेल्या पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्नाच्या चर्चा

काही दिवसांपूर्वी तमन्ना भाटियानं पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तमन्ना ज्या ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करत होती, तिथेच क्रिकेटर अब्दुल रझाकही होता. त्या फोटोनंतर सोशल मीडियावर तमन्ना आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकच्या लग्नाच्या जोरदार अफवा रंगल्या. “मस्ती मस्तीत, अब्दुल रझाक! इंटरनेट खरंच एक मजेशीर ठिकाण आहे. हो, इंटरनेटनं दिलेल्या माहितीनुसार, माझं लग्न काही काळासाठी अब्दुल रझाकशी झालं होतं…”

हसत हसत तमन्ना भाटिया कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हणाली, “माफ करा साहेब, तुम्हाला दोन-तीन मुलं आहेत, मला माहीत नाही, तुमचं आयुष्य काय आहे…! ते खरंच खूप लाजिरवाणं होतं.” पुढे बोलताना तमन्नानं खुलासा केला की, ती एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटन समारंभांसाठी गेलेली, तिथे पाकिस्तानी क्रिकेटपटुही उपस्थित होत…”

ज्यावेळी तमन्नाचा काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत लोक तिचं नातं जोडतात, तेव्हा तिला नेमकं कसं वाटतं? याबाबतही तमन्नानं बोलताना खुलासा केला आहे. तमन्ना म्हणाली की, “जेव्हा कोणताही संबंध नसतो आणि लोक तो जोडतात, तेव्हा खरंच खूप विचित्र वाटतं. पण या गोष्टीला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यासाठी वेळ लागतो आणि तुम्हाला ते स्विकारावंच लागतं, त्यात तुम्ही काहीच करू शकत नाही.”

दरम्यान, हिंदी सिनेमा आणि वेब सीरिज व्यतिरिक्त, तमन्नानं तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 2015 मध्ये आलेल्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’ या चित्रपटातून तमन्ना खूप प्रसिद्ध झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vivek Vaswani On Shah Rukh Khan: ‘शाहरुख आणि माझे शारीरिक संबंध…’; अवघड प्रश्नावर विवेक वासवानीचं थेट उत्तर, प्रियंका चोप्राबाबतही सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.