मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर…. तामिळनाडूच्या र

विजय थलपथी तामिळनाडू सरकारची स्थापना: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 108 जागांवर विजय मिळवणाऱ्या विजय थलपति (Vijay Thalapathy) यांचा तमिळगा वेत्री कळघम अर्थात TVK  पक्ष सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपण राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपाल आपल्या सत्तास्थापनेसाठी (Tamil Nadu Government Formation) सहजपणे निमंत्रण देतील, अशी टीव्हीकेची अपेक्षा होती. मात्र, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर (Governor Rajendra Arlekar) यांनी ‘आधी बहुमत सिद्ध करा, मग सत्तास्थापना करा’, अशी भूमिका घेतल्याने विजय थलपती यांच्यासमोर पेच निर्माण झाला. दोनदा विनंती करुनही राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.  (Tamil Nadu Election Result 2026)

तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी 118 जागा या बहुमतासाठी आवश्यक आहेत. विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाचे 108 उमेदवार विजयी झाले. मात्र, विजय थलपति यांनी दोन जागांवरुन निवडणूक लढवल्याने हा आकडा 107 इतकाच राहतो. टीव्हीकेला काँग्रेसच्या पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांची एकत्रित संख्या 112 इतकी होते. त्यामुळे टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी आणखी 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. एरवी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष सत्तास्थापन करुन नंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करतो. सत्तास्थापनेनंतरच्या काळात बहुमताची जुळवाजुळव केली जाते. विजय थलपती यांच्या टीव्हीकेनेही अशीच योजना आखली होती. मात्र, तामिळनाडूच्या राज्यपालांनी विजय थलपती यांच्या या प्लॅनला ब्रेक लावला आहे.

Tamil Nadu Governor Rajendra Arlekar: तामिळनाडूच्या राज्यपालांची नेमकी भूमिका काय?

१.मी सत्तास्थापनेपासून कोणालाही कोणाला थांबवत नाही किंवा अडवत नाही, मी फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतोय!

२.कोणत्याही पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला हेडकाऊंडशी देणंघेणं नाही,फक्त बहुमत हवं!

३.डीएमके-अण्णाद्रमुक एकत्र आले आणि त्यांनी बहुमत दाखवलं तर त्यांनाही संधी देईन!

४.वेळ लागतोय म्हणून जो काही आमदारांचा घोडाबाजार होईल, पण अस्थिर सरकारला मी परवानगी नाही देणार!

५. पुढचे 2-3 दिवस कोणी आले नाही आणि विजयकडे 118 आमदार नसतील काय? तर विजयनं फक्त मला 118 आमदारांचा पाठिंबा आहे. जर त्यांच्याकडे आमदार नसतील आणि मी त्याला शपथ दिली तर तो आमदारांचा घोडेबाजार नाही का करणार? त्याला कशी परवानगी देऊ?

६. आज-उद्या जो काही आमदारांचा घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणंघेणं नाहीय!

७.सोमवारपर्यंत जर कोणीच सत्तेसाठी आलं नाही तर काय करणार? इतर पर्यायांचा विचार करणार,  त्यावर अजून विचार केला नाहीय पण कायदेशीर बाजू समजूनच निर्णय घेणार!

Tamil Nadu News: तामिळनाडूतील पक्षीय बलाबल – एकूण 234

  • TVK (विजय) – 108
  • द्रमुक – 59
  • AIADMK – 47
  • काँग्रेस – 5
  • पीएमके – 4
  • मुस्लिम लीग – २
  • कम्युनिस्ट पक्ष – २
  • अंतिम फेरी – २
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – २

आणखी वाचा

राज्यपाल ‘त्या’ अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?

आणखी वाचा

Comments are closed.