तामिळनाडू द्रमुकला निरोप देण्याच्या तयारीत आहे.

पंतप्रधान मोदी यांचा घणाघात, युतीचा केला प्रचार

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूत द्रमुकच्या राज्यात प्रचंड भ्रष्टाचार माजला असून, या सरकारला निरोप देण्यास येथील मतदार सज्ज झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी द्रमुकचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्ष आणि अण्णाद्रमुक या पक्षांच्या युतीच्या प्रचाराला प्रारंभ केला. येत्या एप्रिल-मे मध्ये ही निवडणूक आहे.

तामिळनाडूच्या चेंगालपट्टू जिल्ह्यातील मदुरांतकम येथे त्यांनी एका प्रचंड जाहीर सभेत भाषण केले. त्यात त्यांनी द्रमुक सरकारचे वाभाडे काढले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने देशात सर्वत्र उत्तम प्रशासन दिले असून तामिळनाडूची जनताही आता या भ्रष्ट प्रशासनाला कंटाळली आहे. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अण्णाद्रमुक युती या सरकारला सत्तेवरुन घालविणार आहे, असा विश्वास त्यांनी त्यांच्या 45 मिनिटांच्या भाषणात व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची सूचना केल्या.

युतीचे नेतृत्व अद्रमुककडे

तामिळनाडूत भारतीय जनता पक्षाने अण्णाद्रमुक पक्षाशी युती केल्याची घोषणा केली आहे. अद्रमुकनेही या युतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या युतीचे नेतृत्व अद्रमुक नेते एडाप•ाr पलानीस्वामी हे करणार आहेत. या सभेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ‘एक्स’ संदेशही प्रसारित केला आहे. त्यांच्या या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. या जाहीर सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात प्रचाराला अनधिकृत प्रारंभच केला आहे

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या या सभेच्या स्थानी तामिळनाडू प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवील आहे. सभास्थानी ते हेलिकॉप्टरने आले. त्यासाठी विशेष हेलिपॅड सभास्थानाच्या नजीकच निर्माण करण्यात आले होते. सभास्थानीही कठोर बंदोबस्त करण्यात आला होता. ही प्रचारसभा सुखरुप पार पडली, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे. या सभेत तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे अनेक मान्यवर नेते, तसेच अद्रमुकचेही नेते आणि लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री अनबुमणी रामदास, जी. के. वासन, आयजेके या पक्षाचे नेते परिवेंदर, ए. सी. शण्मुगम आणि एएमएमके पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरन हे या सभेला उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आणि अद्रमुक यांच्या या युतीत आणखी दोन स्थानिक पक्षही समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे ही युती द्रमुकच्या युतीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती देण्यात आली.

स्टॅलिन यांचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नाकारले आहे. केंद्र सरकारने तामिळनाडूच्या कोणत्याही आवश्यक मागण्याही पूर्ण केलेल्या नाहीत. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळणार नाही. जनतेला द्रमुकचेच सरकार हवे असून तेच या निवडणुकीत निवडून येईल, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. त्यांनी अद्रमुकवरही जोरदार टीका केली.

'डीम्प' वादाचे निर्णय.

या प्रकट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील द्रमुक आणि मित्रपक्षांच्या सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार या राज्यात 10 वर्षे आहे. तथापि, त्याने समाजाच्या एकात्मतेच्या विरोधात काम केले आहे. नुकताच राज्यातील मदुराई जिल्ह्यातील एका ऐतिहासिक मंदिराच्या दीपप्रज्वलनाचा वाद निर्माण झाला आहे. हा वाद द्रमुक सरकारने हिंदूंची अवमानना करण्यासाठी निर्माण केला आहे,  तामिळनाडूची जनता भगवान शण्मुगम यांची भक्त असून ती द्रमुकला धडा शिकवेल, अशा अर्थाचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभेपूर्वी केले.

Comments are closed.