Tamil Nadu Politics राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रीत करावे व पुढील पाच वर्षे… संजय राऊत यांचा सणसणीत टोला
तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी TVK चे प्रमुख विजय हे 112 आमदारांचे समर्थनाचे पत्र घेऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना भेटायला गेलेले. मात्र राज्यपालांनी विजय यांना 118 आमदारांचे पत्र घेऊन यायला सांगितले. तामिळनाडूच्या लोकभवनाकडून याबाबत पत्रक काढून माहिती देण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना सणसणीत टोला लगावला आहे.
तामिळनाडूत भाजपला फक्त १ जागा मिळाली आहे. तरीही राज्यपाल महोदयांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रीत करायला हवे आणि पुढील ५ वर्षांसाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा, जेणेकरून त्यांना आणखी ११७ आमदारांचा पाठिंबा मिळवता येईल.#तमिळनाडू #भाजप” pic.twitter.com/8fWwIJxJnK
— संजय राऊत (@rautsanjay61) 7 मे 2026
”तामिळनाडूत भाजपला फक्त १ जागा मिळाली आहे. तरीही राज्यपाल महोदयांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रीत करायला हवे आणि पुढील ५ वर्षांसाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा, जेणेकरून त्यांना आणखी ११७ आमदारांचा पाठिंबा मिळवता येईल”, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी ट्विटरवरून केली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाने 108 जागा जिंकल्या. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे टीव्हीकेचा आकडा 113 झाला आहे. मात्र, विजय दोन मतदारसंघातून जिंकल्यामुळे एक जागा कमी होणार आहे. तसेच, बहुमत सिद्ध करताना विधानसभा अध्यक्षांना मत देता येणार नाही. त्यामुळे टीव्हीकेला आणखी सात जागांची आवश्यकता आहे. राज्यपालांनी नेमके यावरच बोट ठेवल्याचे सूत्रांकडून समजते
Comments are closed.