विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी; आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू, 70 जखमी, काहीजण बेपत्ता, नेमकं क

द्रुत वाचन दर्शवा

एआय द्वारे व्युत्पन्न केलेले मुख्य मुद्दे, न्यूजरूमद्वारे सत्यापित

Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: अभिनेता विजय थलपतीच्या (TVK Vijay) करुर (Karur Rally Marathi News) इथल्या राजकीय रॅलीत मोठी चेंगराचेंगरी (Tamil Nadu Stampede) झाली. काल (27 सप्टेंबर) झालेल्या या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमी झाले आहेत. तर काहीजण बेपत्ता झाल्याचीही माहिती आहे. मृतांमध्ये 10 महिलांचा समावेश आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय तर जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने आता करूर अपघाताची दखल घेतली आहे. मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून अपघाताची परिस्थिती आणि घटनास्थळी केलेल्या बचाव आणि मदत प्रयत्नांचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. राज्य सरकारला हा अहवाल लवकरच गृहमंत्रालयाला सादर करावा लागेल. (Tamilnadu Rally News)

नेमकं काय घडलं? (Tamil Nadu Stampede)

मुख्यमंत्री स्टॅलिन करुरमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपालांशी फोनवरुन चर्चा केलीये. तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला तपासाचे आदेश दिले आहेत. तामिळगा वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख आणि अभिनेता विजय थलपतीची करूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यादरम्यान रॅलीत थलपतीचं भाषण सुरू असताना चेंगराचेंगरी (Tamil Nadu Stampede) झाली. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर विजय थलपतीनं त्याचं भाषण थांबवलं. दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचीही माहिती आहे.

विजय थलापतीने व्यक्त केला शोक- (Vijay Thalapathy expressed his condolences)

करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अभिनेता विजय थलापतीने शोक व्यक्त केलाय. आपल्याला असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःख आहे, असं विजय म्हणाला. जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या संवेदना आहेत. रूग्णालयात उपचार घेत असलेले लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनादेखील विजयने केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी

आणखी वाचा

Comments are closed.