चप्पल तुटल्यावर सोडतात, तसं नेते कार्यकर्त्याला सोडतात; तानाजी सावंतांच्या पुतण्याची खदखद

धनंजय सावंत धाराशिव : काका विरोधात माझं बंड नाही, ही निवडणूक काका पुतण्याची नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेत्यामुळे. आमच्या व्यथा आम्ही मांडल्या. मात्र मार्ग निघला नाही म्हणून अपक्ष लढण्याचं पदाधिकाऱ्यांनी ठरवलं. अशी अभिप्राय शिंदेंचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांनी दिलीय.

राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा (Paranda Zilla Parishad) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा (Paranda) तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचल्याची चर्चा आहे. यावर आता स्वतः धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांनी अभिप्राय देत भाष्य केलं आहे.

Dhananjay Sawant : माझी गरज संपली म्हणून मला दहा महिन्यांपासून बोलवलं नाही

आमदार तानाजी सावंत यांची याबाबत माझं काहीही बोलणं नाही. कार्यकर्त्यांची गरज संपली की चप्पल सारखं सोडून नेता पुढे जातो, माझी गरज संपली म्हणून मला दहा महिन्यांपासून बोलवलं नाही. चप्पल तुटल्यावर आपण जसं सोडून जातो, तसं नेते कार्यकर्त्याला सोडतात. माझी एकट्याची ही स्थिती नाहीया, असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलताना व्यक्त केलीहे.

Dhananjay Sawant : भाजपच्या कोणत्याही नेत्याला मी भेटलो नाही

दरम्यानआमदार तानाजी सावंत यांच्या बाबत राजकीय विषयावर कुठलाही संवाद झाला नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याला मी भेटलो नाही. असे म्हणत भाजप प्रवेशाची चर्चा धनंजय सावंत यांनी फेटाळली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतणे धनंजय सावंत यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला स्वतः सह कार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावर ते बोलत होते.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.