Tanaji Sawant son Rushiraj Sawant missing case new update about his two friends news in Marathi
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) सायंकाळी समोर आली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे.
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) सायंकाळी समोर आली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच पोलीस यंत्रणानाही खडकन जागी झाली आणि त्यांनी शोध सुरू केला. पण ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो आपल्या मित्रांसोबतच एका खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकच्या दिशेने गेल्याची माहिती नंतर पोलिसांकडून देण्यात आली. पण ऋषीराज सावंतसोबत असलेले ते दोघे कोण होते? याची माहिती आता समोर आली आहे. (Tanaji Sawant son Rushiraj Sawant missing case new update about his two friends)
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता झाला नव्हता, तर तो न सांगता आपल्या मित्रांसोबत एका खासगी विमानातून बँकॉकच्या दिशेने गेला होता. यावेळी त्याच्यासोबत प्रवीण उपाध्याय आमि संदीप वासेकर असे त्याचे दोन मित्र सुद्धा होते. परंतु, ऋषीराज सावंत याचे अपहरण झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात आणि राज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. तर सावंत सुद्धा काही वेळातच पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी पोलिसांशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधला. आपल्या मुलाचे अपहरण झाले नसून तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली.
हेही वाचा… Sanjay Raut : बंद होणाऱ्या योजनांविरोधात एकनाथ शिंदेंनी आवाज उठवावा, राऊतांचा सल्ला
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले की, ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रांसोबत आहे. पण तो नेमका कुठे आहे याची माहिती नव्हती. तो चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली. बेपत्ता का अपहरण असे काही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही आहेत. घराबाहेर पडताना तो मला सांगतो. कधी वाकडला जरी गेला तरीही मला सांगून जातो. दिवसातून त्याचे मला 15 वेळा फोन येतात. पण यावेळी त्याने स्वत:ची गाडी घेतली नाही आणि दुसऱ्या गाडीने गेला. फोन न करता मुलगा घरातून गेला होता. त्यामुळे आम्ही काळजी म्हणून तक्रार केली. त्याला सोडायला वाहनचालकही गेला होता, त्याने सांगितले की त्या तिघांना विमानतळावर सोडले, त्याच्यामुळेच आम्हाला समजले. त्याच्याशी संपर्क झाला नाही म्हणून मी अस्वस्थ झालो आहे. खासगी विमान आहे की साधे विमान? याबाबत आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे.
Comments are closed.