तानियाची ऐतिहासिक झेप, युवा ऑलिम्पिकमध्ये बीच पुस्तीचे पहिले पदक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी पुस्तीच्या इतिहासात आणखी एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. सेनेगलमधील डकार येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या तानियाने महिलांच्या 75 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. युवा ऑलिम्पिकच्या बीच पुस्ती प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे.

विशेष म्हणजे बीच पुस्तीचा युवा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या प्रकारातील पहिलेच हिंदुस्थानी पदक जिंकण्याचा मान तानियाला मिळाला. या कामगिरीमुळे तिचे यश आणखी महत्त्वाचे ठरले आहे. तानियाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अत्यंत आत्मविश्वासाने केला. उपांत्य फेरीत तिने अमेरिकेच्या मॅटिल्डा ह्रुबीचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तिच्यासमोर चीनची मिन झाओ हिचे आव्हान होते. झाओ ही 2025 मधील 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील विजेती असल्याने ही लढत सोपी नव्हती.

अंतिम फेरीत तानियाने झुंजार प्रतिकार केला, मात्र चीनच्या झाओने 2-1 अशी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. तानियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पराभव झाला असला तरी तिच्या कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. तानियाने यापूर्वी बापू येथे झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक पुस्ती स्पर्धेत महिलांच्या 69 किलो गटात कांस्यपदक, तर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते.

या पदकामुळे डकार युवा ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानची एपूण पदकसंख्या सात झाली आहे. त्यामध्ये तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. जलतरणपटू धिनिधी देसिंगूने दोन कांस्यपदके जिंपून विशेष ठसा उमटवला आहे. तिर्थंक पेगूनेही पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक जिंकत युवा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पहिला हिंदुस्थानी पुरुष जलतरणपटू होण्याचा मान मिळवला.

Comments are closed.