‘ताडदेवचा राजा’ मंडळाचा यंदा कर्करोगमुक्त महाराष्ट्राचा संकल्प

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ’ताडदेवचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा कर्करोगमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. यंदा मंडळाचे 87 वे वर्ष आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्यानेही विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत मंडळाकडून कॅन्सरविषयी जनजागृती, प्रतिबंध आणि तपासणी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

’ताडदेवाचा राजा’ मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावतारावर आधारित आकर्षक सजावट करण्यात आली असून राजदरबाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सिद्धहस्त मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या हस्ते या मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. मंडळाचे प्रमुख विश्वस्त सिद्धेश मांणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त गणेश भोसले, सागर राणे, मंडळाचे अध्यक्ष हरी तावडे, सचिव संजोग जाधव, खजिनदार विराज परब, संग्राम राणे, ओमकार शिर्के, आदित्य यादव, अभिजीत प्रभू आणि अंकुर सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्सव आणि उपक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.