वाढीव टॅरिफला 1 ऑगस्टपर्यंत स्थगिती, डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंदुस्थानला दिलासा

जपान आणि दक्षिण कोरियावर 25 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने हिंदुस्थानी निर्यातदारांना दिलासा दिला आहे. हिंदुस्थानवरील टॅरिफ स्थगितीला डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे नव्या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांना आणखी वेळ मिळणार आहे.
दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर ‘जशास तसा’ कर लावण्याची घोषणा केली होती. ही घोषणा त्यांनी प्रत्यक्षातही आणली. त्यामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली. चीन व अमेरिकेत त्यावरून टॅरिफ वॉरही सुरू झाले. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 26 टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली होती, मात्र या निर्णयाला ट्रम्प यांनी 90 दिवसांची स्थगिती दिली. स्थगितीची ही मुदत 9 जुलै रोजी संपत आहे. सध्या हिंदुस्थान व अमेरिकेमध्ये व्यापारविषयक चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांनी कर स्थगितीला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Comments are closed.