शेख हसीना यांची घरवापसी लांबणार? पासपोर्ट अर्जावरील सही बनावट असल्याचा बांगलादेशचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीन गेल्या दोन वर्षांपासून हिंदुस्थानात आश्रयाला आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता गमावल्यानंतर शेख हसीना यांनी हिंदुस्थानात आश्रय घेतला होता. शेख हसीना यांनी मायदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने त्यांना परत पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून केली जात आहे. मात्र शेख हसीना यांच्या पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी नव्याने पाठवण्यात आलेल्या अर्जावरून वाद निर्माण झाला आहे. या अर्जावरील शेख हसीना यांची सही बनावत असल्याचा आरोप बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे राजकीय सल्लागार मोहम्मद रशीद खान यांनी केला आहे. ‘भारताचा काळ‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.