झिम्बाब्वेला ‘ती’ चूक पडली महागात! ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट अन् वेस्ट इंडिज विजयी

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या साखळी फेरीत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून मोठा पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (२३ फेब्रुवारी) झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव केला. एवढ्या मोठ्या पराभवाने झिम्बाब्वेच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता पुढील सामने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध आहेत.

या सामन्यात झिम्बाब्वेला विजयाची आशा होती, मात्र त्यामध्ये त्यांनी स्वत:च खूप मोठी चूक केली. ते गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळेच वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. त्यानी २० षटकात ६ विकेट्स गमावत २५४ धावा केल्या. ही धावसंख्या करण्यापासून झिम्बाब्वे त्यांना रोकू शकत होता, मात्र क्षेत्ररक्षणात अशा काही चूका झाल्या जो या सामन्याच्या टर्निंग पॉइंट बनला. ते म्हणतात ना ‘कॅच छूटा मॅच छूटा’ असेच काहीसे या सामन्यात झाले.

झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रजाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची पहिलीच विकेट ३ऱ्या षटकात पडली. ब्रेंडन किंग ९ धावा करत बाद झाला. यामुळे झिम्बाब्वेने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली. त्यानंतर शिमरन हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो ९ धावांवरच असताना ताशिंगा मुसेकिवा ज्याने ब्रेंडनची कॅच पकडली त्यानेच हेटमायरची कॅच सोडली. तेव्हा वेस्ट इंडिजने केवळ २६ धावा केल्या होत्या.

शिमरनने त्याला मिळालेल्या संधीच मग चांगलाच फायदा उचलला. त्याने १९ चेंडूतच ५० धावा केल्या, ज्या टी२० विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद ठरल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मुसेकिवाने हेटमायरची कॅच सोडली, तेव्हा हेटमायर ७० धावांवर होता. हेटमायरने ३४ चेंडूत ७ षटकार आणि तेवढेच चौकार मारत ८५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या झिम्बाब्वेचा जाव १७.४ षटकात सर्वबाद १४७ धावसंख्येवरच संपुष्टात आला.

जर हेटमारयचा तो कॅच पकडला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. आता झिम्बाब्वेचा पुढील सामना भारताविरुद्ध २६ फेब्रुवारीला आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सुपर-८चे सामने गमावल्याने हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात ते असतील. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

Comments are closed.