परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला होता; पण या टास्क फोर्सला तीन महिन्यांच्या मुदतीत अहवाल सादर करता आलेला नाही. त्यामुळे या टास्क फोर्सला मुदतवाढ देण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्याशिवाय सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्ससह सेंटर ऑफ एक्सलन्सच्या टास्क फोर्सलाही मुदत दिली आहे.

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्रांचा देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्यातीसाठीचा वाटा सध्या 60 अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज आहे. पण 2020पर्यंत हाच वाटा 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक क्षमता केंद्रांची संख्या सध्याच्या 1 हजार 900वरून 2 हजार 500पर्यंत वाढेल. या सर्वांमधून दोन लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.