टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?

टाटा कॅपिटलच्या संचालक मंडळानं आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे. टाटा कॅपिटल ही टाटा ग्रुपची वित्तीय क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची 92.92 टक्के मालकी टाटा सन्सकडे आहे.

टाटा कॅपिटल ऑफर फॉर सेलद्वारे काही शेअरची विक्री करेल. तर काही शेअर नव्यानं जारी करेल. नव्यानं जारी केल्या जाणाऱ्या शेअरची संख्या 2 कोटी 30 लाख इतकी असेल.

टाटा कॅपिटलचा आयपीओच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. हा आयपीओ सप्टेंबर 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या वित्तीय संस्थांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार कंपनीला सप्टेंबर 2025 पूर्वी आयपीओ आणावा लागेल.

टाटा कॅपिटल आयपीओ हा या दशकातील टाटा ग्रुपचा दुसरा आयपीओ असेल. टाटा टेक्नोलॉजीनं नोव्हेंबर 2023 मध्ये आयपीओ आणला होता.

टाटा कॅपिटलचा आयपीओ 15000 कोटी रुपयांचा असेल. तर,  ह्युंदाई मोटर्स इंडियाचा आयपीओ 22 ऑक्टोबर 2024 ला  आला होता. तो आयपीओ 27589 कोटी रुपयांचा होता.  एलआयसीचा आयपीओ 17 मे 2022 ला लिस्ट झाला होता तो आयपीओ 20557 कोटींचा होता. तर, पेटीएमचा आयपीओ 18 नोव्हेंबर 2021 ला आला होता. तो 18300 कोटी रुपयांचा होता. कोल इंडियाचा आयपीओ 4 नोव्हेंबर 2010 आला होता तो 15475 कोटी रुपयांचा होता. आता टाटा कॅपिटलचा आयपीओ 15000 कोटींच्या उभारणीसाठी येणार आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

येथे प्रकाशितः 26 फेब्रुवारी 2025 09:33 एएम (आयएसटी)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Comments are closed.