माथेरानमध्ये टॅक्सीचालकांचा बंद; पर्यटकांचा मनस्ताप वीकेण्ड, वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांची कारवाई

कर्जत-माथेरान मार्गावर आणि माथेरान घाटात होत असलेली वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी आज बेशिस्त वाहनचाल कांवर कारवाई सुरू केली. या कारवाईचा फटका टॅक्सीचाल कांनाही बसल्यामुळे त्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या पर्यटकांचे आतोनात साल झाले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी तीन टॅक्सीचालकांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर प्रवासी सेवा सुरू झाली. मात्र सुमारे पाच तास टॅक्सीचा चक्का जाम राहिल्याने पर्यटकांचा विकेण्ड मनस्ताप देणारा ठरला.
विकेण्डला माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ मोठा असतो. अनेक अतिउत्साही पर्यटक आपली वाहने रस्त्यात उभी करून निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असतात. त्यामुळे विकेण्डला कर्जत-माथेरान मार्ग आणि नेरळ-माथेरान घाटात मोठी वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आज सकाळी अचानक नेरळ-माथेरान चालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला. 30 हून अधिक कारचालकांवर केलेल्या कारवाईमुळे टॅक्सी युनियनने अचानक काम बंद केले.
Comments are closed.