टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, काय घडतंय?


टीसीएस टाळेबंदी: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसाचं शुल्क 1 हजार डॉलरवरुन 1 लाख डॉलर्स केल्यानं आयटी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. आयटी कंपन्यांचे स्टॉक मोठ्या प्रमाणात गडगडले होते. आयटी कंपन्यांना भारतातून एखादा कर्मचारी अमेरिकेत नियुक्त करायचा असेल तर त्याच्या व्हिसासाठी आता 88 लाख रुपये भरावे लागतील. जे यापूर्वीचं शुल्क 88 हजार रुपये इतकं होतं. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर आयटी कंपन्यांचे स्टॉक्स गडगडले होते.  ट्रम्प यांच्या धोरणांमुळं आयटी कंपन्या अडचणीत असतानाच आणखी एक नवी अपडेट समोर आली आहे. मनीकंट्रोल हिंदीच्या वृत्तानुसार भारतातील टाटा ग्रुपची प्रमुख आयटी कंपनी टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जात असल्याच्या चर्चा आहेत. टीसीएसचे प्रमुख के कृतिवासन यांनी दोन महिन्यांपूर्वी मनीकंट्रोल सोबत बोलताना 2 टक्के  म्हणजेच 12000  अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल असं म्हटलं होतं.

TCS Layoffs : टीसीएसमध्ये नेमक्या किती कर्मचाऱ्यांची कपात?

आयटी यूनियन आणि टीसीएसच्या कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार कपात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असू शकते. टीसीएसच्या एका कर्मचाऱ्यानं राष्ट्रीय यूनियनमध्ये सक्रीय आहे, त्यानं मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत 10 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांनी संपर्क केला असून कर्मचारी कपातीची संख्या 30 हजारांच्या वर जाऊ शकते. कारण, कर्मचाऱ्यांना स्वत: राजीनामा देण्यास सांगितलं जातं, त्यामुळं ते कपातीच्या यादीत दिसणार नाहीत.

गेल्या काही महिन्यांमध्ये AIITEU, FITE, UNITE आणि KITU सारख्या आयटी यूनियन्सकडून टीसीएसमधील कपातीविरोधात अभियान चालवलं आहे. तर, दुसरीकडे कंपनीच्या सूत्रांनुसार चर्चेत राहण्यासाठी असा प्रकार केला जात असून कर्मचारी कपातीचे मोठे आकडे सांगितलं जात आहे. टीसीएस इतक्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून नव्या डील्स मिळत असताना काम करु शकत नाही. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार त्यांनी कंपनीकडे प्रतिक्रिया मागितली असून त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही.

मनी कंट्रोल नुसार एका कर्मचाऱ्याच्या मते कंपनीच्या कार्यालयामध्ये भीतीचं वातावरण आहे. कोणाला पुढच्या वेळी बोलावलं जाईल यांची माहिती नाही. त्यांच्या कार्यालयातील 8-10 वर्षाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ कर्मचारी कर्मचारी कपातीचा सामना करत आहेत. एचआरचा ईमेल येतो आणि तातडीनं नोकरी सोडण्यास सांगितलं जातं. काही लोकांना एका आठवड्याचं नोटीस दिलं जातं, काही लोकांना तातडीनं निघावं लागतं, असा दावा केला जातोय.

टीसीएसचं नवं धोरण

टीसीएसचे प्रमुख के कृतिवासन यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं की ते एआय आणि ऑपरेटिंग मॉडेलच्या बदलांवर धान्य देत आहेत. काम करण्याची पद्धती बदलत आहेत. आपल्याला भविष्यासाठी तयार आणि सतर्क असलं पाहिजे आणि भविष्यात कोणती कौशल्य आवश्यक आहेत, हे पाहत आहोत.

जूनमध्ये कंपनीनं एक नवं धोरण लागू केलं होतं. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप सोबत स्वत: संपर्क करावा लागेल. त्याद्वारे त्याला एखादा प्रोजेक्ट दिला जाईल. कर्मचाऱ्याला किमान 225 काम करण्यासाठी तयार असलं पाहिजे. जर कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाई शकते आणि गरज पडल्यास नोकरीवरुन काढलं जाऊ शकतं. कर्मचारी एका वर्षात 35 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रोजेक्टशिवाय असू नये.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.