मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियामध्ये मोठा बदल! तरुण खेळाडूला लागली अचानक लॉट्री
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जून महिन्यात कसोटी आणि वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. याच दरम्यान हिंदुस्थान ‘A’ टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ‘A’ श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळणार असून त्यासाठी काहीच दिवसांपूर्वी BCCI ने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. मात्र, या 15 सदस्यीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे एक खेळाडू या मालिकेला मुकणार असून एका खेळाडूची अचानक संघात एन्ट्री झाली आहे.
श्रीलंकेमध्ये तिरंगी मालिकेला 9 जून पासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. टीम इंडियाचे तरुण तडफदार खेळाडू या मालिकेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. हर्ष दुबेचा सुद्धा या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, आता त्याच्याजागी अनुकूल रॉयची संघात वर्णी लागली आहे. सध्या दमदार फॉर्मात असलेल्या तिलक वर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ‘A’ 9 जूनला आपला पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल तर टीम इंडिया ‘A’ आपला दुसरा सामना 11 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेमध्ये तिन्ही संघ एकमेकांना दोन वेळा भिडतील आणि अखेर जे दोन संघ गुणतालिकेत अव्वल राहतील त्यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला जाईल.
🚨 बातम्या🚨
श्रीलंकेतील आगामी तिरंगी मालिकेसाठी अनुकुल रॉयचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.
तो हर्ष दुबेची जागा घेतो, ज्याला त्याचा पहिला कॉल-अप आला आहे #TeamIndiaचे कसोटी आणि एकदिवसीय संघ.
अधिक तपशील 🔽https://t.co/NJ7a2YRcRs
— BCCI (@BCCI) 21 मे 2026
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 6 जून पासून कसोटी मालिकेतील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी हर्ष दुबेची संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हर्ष दुबेच्या जागी टीम इंडियाच्या A संघात अनुकूल रॉयला संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच हर्ष दुबेची टीम इंडियाच्या मुख्य संघात निवड झाल्याने त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया A संघ
टिळक वर्मा (कर्ंधर), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उक्करंधर), आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमार सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, अरविंद खान, अरविंद खान, एन. रॉय.
Comments are closed.