IND vs SA: दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण मारणार बाजी? जाणून घ्या रायपूरच्या खेळपट्टीचा अंदाज

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना 3 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली रांचीमध्ये टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या लक्षवेधी शतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर गोलंदाजीत कुलदीप यादवने (Kuldeep yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली.

त्याचप्रमाणे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हर्षित राणा (Harshit Rana) यांनीही विजयात मोठा वाटा उचलला. दुसरीकडे, पराभवानंतर दक्षिण आफ्रिका या सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत असेल. त्यांच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत लढा दिला, पण गोलंदाजांनी मात्र भरपूर धावा दिल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानावर बॅट आणि बॉल दोघांतही तगडा सामना पाहायला मिळतो. सुरुवातीची पिच बॅटिंगसाठी उत्तम असते आणि चेंडू सहज बॅटवर येतो. मात्र सामना जसजसा पुढे जातो, तसतसे स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची होते. रायपूरचे हे मैदान अतिशय मोठ्या स्कोअर्ससाठी प्रसिद्ध नाही.

टी-20 मध्येही इथे फक्त एकदाच 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. या मैदानावर आत्तापर्यंत फक्त एकच वनडे सामना खेळला गेला आहे. हा सामना 2023 मध्ये भारत–न्यूझीलंड यांच्यात झाला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडची संपूर्ण टीम फक्त 108 धावांत आऊट झाली होती. भारताने 109 धावांचे लक्ष्य केवळ 20.1 षटकांत सहज पूर्ण केले होते. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी स्कोअर 108 धावा, तर दुसऱ्या डावात 111 धावा इतका आहे.

Comments are closed.