IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! के एल राहुल करणार टीम इंडियाचं नेतृत्व

भारत आणि दक्षिण आफ्रिका (Odi Series in between IND vs SA) यांच्यात होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघाचं कर्णधार पद केएल राहुलला देण्यात आलं आहे. शुबमन गिल (Shubman gill out of the series) मात्र बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या मानेला आलेल्या ताणामुळे तो मैदानाबाहेर गेला होता आणि आता तो वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याची जागा आता केएल राहुलने (KL Rahul) घेतली आहे.

खूप दिवसांनंतर केएल राहुल पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) यांनाही संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळल्यानंतर आता हे दोन्ही खेळाडू भारतीय चाहत्यांना पुन्हा घरच्या मैदानावर दिसणार आहेत.

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) भारतासाठी शेवटचा सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता. जवळपास 23 महिन्यांनंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंडिया A साठी त्याने अलीकडेच उत्कृष्ट कामगिरी केली होती, एक शतक आणि अर्धशतकही ठोकले होते. त्याच्या त्या कामगिरीचे फळ म्हणून त्याला संधी मिळाली आहे.

रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पुन्हा संघात स्थान मिळाले आहे, ज्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमीला (Mohmmed Shami) या मालिकेत संधी मिळालेली नाही, जरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज (Jasprit Bumrah & Mohmmed Siraj) या दोघांना आराम देण्यात आला आहे. 3 सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

भारताची वनडे टीम

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

Comments are closed.