टीम इंडियाच्या जर्सीवरून Dream11 होणार गायब? आशिया कपमध्ये स्पॉन्सर शिवाय उतरायची का आली वेळ? ज

टीम इंडिया प्रायोजकांशिवाय: आशिया कप 2025 अगदी तोंडावर आला आहे आणि काही दिवसांतच या रोमांचक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र, यावेळी टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरू शकते. यामागचं कारण म्हणजे ऑनलाईन गेमिंग बिल. या बिलानंतर ड्रीम-11 वर बंदी येणार आहे, आणि तेच टीम इंडियाचे अधिकृत जर्सी स्पॉन्सर आहेत. त्यामुळे बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील करार रद्द होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

बीसीसीआयचा ड्रीम११ सोबतचा करार रद्द होण्याच्या उंबरठ्यावर

बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यात तब्बल 358 कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार झाला होता. जुलै 2023 पासून ड्रीम-11 हा टीम इंडियाच्या जर्सीचा अधिकृत स्पॉन्सर होता. मात्र, आता ऑनलाईन गेमिंग बिलामुळे ड्रीम-11 वर आलेल्या संकटामुळे बीसीसीआयचा हा करार धोक्यात आला आहे. यामुळे टीम इंडियाला एशिया कपच्या आधीच नव्या स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागणार असल्याचं दिसतं.

टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळणार?

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरला होणार आहे. ही स्पर्धा जवळ आली आहे आणि Dream11 या मुख्य प्रायोजकाच्या भवितव्यावर संकट निर्माण झाले आहे. ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream11 वर बंदी लागू होण्याची शक्यता असल्याने BCCI आता नवा स्पॉन्सर शोधण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र स्पर्धा अगदी जवळ आल्याने भारताला नवा जर्सी स्पॉन्सर मिळणे अवघड दिसत आहे. त्यामुळे टीम इंडिया कदाचित आशिया कप 2025 मध्ये जर्सीवर कोणतेही स्पॉन्सरशिपचे नाव नसलेली जर्सी परिधान करून मैदानात उतरेल.

2023 मध्येही टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळली होती…

अशी परिस्थिती ही पहिल्यांदाच घडणार नाही. जून 2023 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही भारताने स्पॉन्सरशिवाय खेळले होते. मार्च 2023 मध्ये BCCI चा Byju’s सोबतचा करार संपला होता आणि अंतिम सामन्यापूर्वी नवीन स्पॉन्सर मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्या सामन्यात भारतीय संघाने फक्त BCCI चा लोगो आणि अॅडिडासच्या तीन पट्ट्यांसह साधी जर्सी परिधान केली होती.

हे ही वाचा –

Anjali Tendulkar : अंजली तेंडुलकरनेही घेतला सरकारी योजनेचा लाभ; विरारमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती?

Rohit Sharma : लॅम्बोर्गिनीमध्ये जात असताना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये पुरता फसला रोहित शर्मा, चाहत्यांना बघताच ते केलं अन् Video झाला व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.