रोहितचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल? पहा काय म्हणतोय व्हिडीओमध्ये????

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा शिव्या देताना दिसत आहे. हा व्हिडीओ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या विजयानंतरचा आहे. ज्यात रोहित शर्मा विराट कोहलीशी बोलताना शिवी देत म्हणाला, हे मला निवृत्तीबाबत विचारत आहेत, (***@@@)?;;;,

पाहा व्हिडिओ-

रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार असल्याच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि म्हटले की तो इतक्या लवकर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा म्हणणार नाही. (Rohit Sharma Statement On His Retirement)

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने धमाकेदार खेळी खेळली. त्याने 76 धावा करत संघाचा पाया मजबूत केला. ज्यामुळे टीम इंडिया सुरुवातीपासूनच न्यूझीलंडवर भारी होती. रोहितच्या या शानदार खेळीने त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

Comments are closed.