IND VS ENG; चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रोहित विराटला फाॅर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी, नाहीतर….

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेचा निकाल काहीही असो, पण या दरम्यान दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होईल ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. दोघेही बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. तसेच त्याचा फॉर्म अजूनही गायब आहे. जर त्यांना इंग्लंडशी सामना करायचा असेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा दावा ठोकायचा असेल, तर दोघांनाही तोच करिष्मा दाखवावा लागेल ज्यासाठी ते ओळखले जातात.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत या दोघांनाही आपला फॉर्म परत मिळवण्याची उत्तम संधी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत हे दोन्ही फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. यानंतर, जेव्हा दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळले, तेव्हाही त्यांना काही खास कमागिरी करता आली नाही. रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळला. या सामन्याच्या पहिल्या डावात तो फक्त 3 धावा करू शकला, तर दुसऱ्या डावात त्याने 28 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीत अपेक्षित आत्मविश्वास दिसून आला नाही. तर विराट कोहली रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळला. ज्यामध्ये तो फक्त सहा धावा करून बाद झाला. सामन्याचा दुसऱ्या डाव खेळला गेला नाही.

चांगली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वनडे फॉरमॅट खूप आवडतो. दोघांनीही यात खूप धावा केल्या आहेत. याशिवाय, ते काही नवीन विक्रमही रचतील. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसेल, तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली जबाबदारी सांभाळेल. शेवटच्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली तेव्हा त्याने तीन डावांमध्ये 157 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट सुमारे141 होता. मात्र, विराट कोहलीची बॅट चालली नाही. त्याला एकही धाव करता आले नाही.

हेही वाचा-

नागपुर पोलिसांचा खाक्या! थेट टीम इंडियाच्या सदस्यालाच संघासोबत सामील होताना थांबवले!
नशीब उजळले..! ‘हा’ खेळाडू होणार आयपीयल विजेत्या संघाचा कर्णधार;
‘हा’ स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात पाहिजे, पाहा काय म्हणाला रविचंद्रन अश्विन

Comments are closed.