ट्रॉफी न घेता सेलिब्रेशन, टीम इंडियाने मैदान गाजवले; पाकिस्तानी खेळाडूही ड्रेसिंग रुममधून बघत ब


टीम इंडिया ट्रॉफीशिवाय साजरा करा: भारतीय संघाने (Team India) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया कपवर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) नाव कोरलंय. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंगने (Rinku Singh) अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे.

दुबईत मध्यरात्री नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवत भारताने विक्रमी नवव्यांदा किताब पटकावला. पण या विजयानंतरही भारतीय खेळाडूंना ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली नाही आणि टीम इंडिया विनाट्रॉफी (Team India Celebrate Without Trophy) परतली. यामागचे कारण ठरले आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi News). भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.

दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. परंतु, सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभातच वाद निर्माण झाला. भारतीय संघाने ACC आणि PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. मोहसीन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीही आहेत आणि त्यांनी भारत व भारतीय संघाबद्दल वादग्रस्त विधाने तसेच पोस्ट केल्या होत्या. त्यामुळेच टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

मोहसीन नक्वी यांनी मात्र ठामपणे सांगितले की, ACC च्या नियमानुसार अध्यक्ष म्हणून ट्रॉफी देण्याचा अधिकार त्यांचाच आहे. त्यामुळे पारितोषिक वितरण समारंभ तब्बल सव्वा तास उशिरा झाला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपापली पदके घेतली, पण भारतीय खेळाडूंनी विजेतेपदाची पदकेही नाकारली आणि ट्रॉफीही स्वीकारली नाही.

ट्रॉफी न घेता सेलिब्रेशन, टीम इंडियाने मैदान गाजवले (Team India Celebrate Without Trophy)

शेवटी पारितोषिक वितरण समारंभ ट्रॉफीशिवायच संपला. समालोचक सायमन डूल यांनीदेखील सांगितले की, टीम इंडिया आज आपली ट्रॉफी घेणार नाही. त्यानंतर नक्वी आणि सर्व अधिकारी मंचावरून निघून गेले. लगेचच भारतीय संघाने त्या मंचावर आला आणि ट्रॉफी नसतानाही विजयाचा जल्लोष केला. खेळाडूंनी ट्रॉफी उचलल्याचा अभिनय करत मजा केली आणि अनेक फोटोही काढले. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूही ड्रेसिंग रुममधून बघत बसले.

हे ही वाचा –

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.