INDW vs SAW: टीम इंडियाने विश्वचषक जिंकला! हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रचला इतिहास
महिला विश्वचषक 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळला गेला (ICC womens world cup final INDW vs SAW). या सामन्यात तब्बल 52 वर्षांनी विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे.
विश्वचषकाचा अंतिम सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यावर पावसाचं सावट होतं त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला आणि दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 298 धावांचा मजबूत डोंगर उभा केला होता. हे आव्हान पूर्ण करण्यात दक्षिण आफ्रिका अयशस्वी ठरली. भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेट्स दीप्ती शर्माने घेतल्या. तसेच शेफाली वर्माने देखील फलंदाजी सोबतच गोलंदाजी मध्येही शानदार कामगिरी करत 2 विकेट्स पटकावल्या. अमनजोत कौरने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले तसेच तिने पकडलेला झेल अद्भुत होता.
भारताकडून सर्वाधिक धावा शेफाली वर्माने केल्या तिने 78 चेंडूत 87 धावा झळकावल्या. स्मृती मंधानाने 58 चेंडूत 45 धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्जने 37 चेंडूत 24 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 29 चेंडूत 20 धावा जोडल्या. अखेरीस दीप्ती शर्माने खालच्या फळीतील जबाबदार खेळ करत 58 चेंडूत 58 धावा केल्या.
Comments are closed.