टीम इंडियाच्या पराभवानंतर हफीजपासून ते शोएब अख्तरपर्यंत सगळ्यांनी चोळलं जखमेवर मीठ

टीम इंडियाच्या पराभवावर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी उधळले विष : सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील माजी क्रिकेटपटूंनीही टीव्ही शोमध्ये बसून भारतीय संघावर जोरदार टीका केली आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने भारताच्या चुका अधोरेखित करत, “टीम इंडिया कशी एक्सपोज झाली?” यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाचं स्वतःचं सेमीफायनलचं गणित अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांना इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध अजून दोन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. तरीही भारतीय संघाच्या पराभवावर तिकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

टीम इंडियाच्या पराभवावर पाकिस्तानी माजी खेळाडूंची प्रतिक्रिया

मोहम्मद हाफिज

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मोहम्मद हफीजने एका पाकिस्तानी शोमध्ये प्रतिक्रिया देताना म्हटले की, दक्षिण आफ्रिकेने आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत किताब जिंकला होता, त्याचीच ही परतफेड असल्याचं त्यांनी सूचित केलं.

सकलेन मुश्ताक

माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक याने तर टीकेची पातळी ओलांडत भारतीय संघावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. त्याने एका पाकिस्तानी कार्यक्रमात असेही म्हटले होते की, दक्षिण आफ्रिकेने खरोखरच टीम इंडियाचा अपमान केला आहे.  इतकंच नव्हे, तर ‘रगडा’ आणि ‘घसीटा’ यांसारखे शब्द वापरत त्यांनी पराभवाचं तीव्र वर्णन केलं.

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दक्षिण आफ्रिकेसमोर भारताची गोलंदाजी पूर्णपणे एक्सपोज झाली, असा त्याने दावा केला.

मोहम्मद अमीर

माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानेही भारतीय संघावर टीका करताना म्हटलं की, या टी-20 विश्वचषकात प्रथमच भारताने धावांचा पाठलाग करताना दबाव अनुभवला आणि तेथेच संघ उघडा पडला. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचं त्याने नमूद केलं.

एकंदरीत, भारताच्या पराभवानंतर सीमापार टीकेचा आवाज वाढला असला, तरी मैदानावर उत्तर देण्याची जबाबदारी आता टीम इंडियावरच आहे. आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी पुनरागमन करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा  –

India Playing 11 vs Zimbabwe : पराभवानंतर खळबळ! द. आफ्रिकेच्या धक्क्यानंतर टीम मॅनेजमेंट अ‍ॅक्शन मोडमध्ये; पुढच्या सामन्यात प्लेइंग-11 मधून 4 खेळाडू OUT?

आणखी वाचा

Comments are closed.