IND vs PAK: पाकिस्तानचा 7 विकेट्सने शानदार धुव्वा उडवत टीम इंडियाचा आशिया कपमध्ये सलग दुसरा विजय!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला फक्त 127 धावा करता आल्या. पाकिस्तान संघासाठी सर्वाधिक 40 धावा साहिबजादा फरहानने केल्या.
टीम इंडियाने फलंदाजीची सुरुवात सुद्धा शानदार पद्धतीने केली. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) त्याच्या दमदार अंदाजात खेळत षटकार चौकारांच्या जोरावर 31 धावा केल्या. गिल (Shubman gill) आणि अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी चांगली भागीदारी रचली. तिलक वर्मा 31 धावा करून बाद झाला.
सूर्यकुमार यादवने खऱ्या अर्थाने कर्णधार पद भूषवत संयम ठेवत 47 धावा केल्या. टीम इंडिया साठी प्रत्येक गोलंदाजाने म्हणजेच कुलदीप यादव, अक्षर पटेल, आणि जसप्रीत बुमराह यांनी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Comments are closed.